Wednesday, February 27, 2008

ऋषीतुल्य संभाजीरावांवर सांगलीत लाठीमार !


दि॥ २७ फेब्रुवारी,


सांगलीत आज सकाळी "जोधा - अकबर" चित्रपटाविषयी निषेध नोंदवतांना तब्बल ८० वर्षांच्या संभाजीराव भिडेंसारख्या ऋषितुल्य आणि ज्येष्ठ व्यक्तीवर पोलीसांनि अमानुष लाठीमार केला... निदर्शने शांततेत सुरु होती... परन्तु पोलिसांनी संभाजीरावांवर ठरवून हल्ला केला असल्याचे सांगलीतील नागरिकांचे म्हणणे आहे... संभाजीराव भिडे या लाठीमारात बरेच जखमी झाले आहेत... अन्य शंभर जण देखील या लाठीमारात जखमी झाले आहेत...

http://www.hindujagruti.org/news/3815.html

दरम्यान सांगलीच्या नागरिकांनी पोलिस अधिक्षक कृष्णप्रकाश यांच्या निलंबनाची मागणी केली आहे... कृष्णप्रकाश यांनीच संभाजीरावांना घाणेरडी शिवीगाळ करून त्यांना खाली पाडून मारहाण केली आहे...

किल्ले रायगड येथील शिवस्मारकाची व्यवस्था संभाजीराव भिडेंच्या मार्गदर्शनाखाली "शिवप्रतिष्ठान"तर्फे सांभाळली जाते... मात्र अनेक तरुणांचे प्रेरणास्थान असलेले संभाजीराव भिडे काही राजकारण्यांच्या डोळ्यात सलत असतात असे सांगली परिसरात बोलले जाते...


"जॊधा अकबर" सारख्या इतिहासाशी प्रतारणा करणा-या चित्रपटावर शिवाजी महाराजांचा वारसा जपणा-या स्वाभिमानी जनतेने बहिष्कार घालावा असे आवाहन आंदोलनात सहभगी झालेल्या युवकांनी केले आहे... अकबरासह मुघल सम्राटांनी राजपुत स्त्रियांवर अत्याचार केले म्हणुन तर राजपुत स्त्रियांना "जोहार" करण्याची वेळ आली... मात्र हा अत्याचारांचा इतिहास लपवून आकबराचे उदात्तीकरण करण्यचा प्रयत्न होत असल्याबद्दल समाजात नाराजी पसरत चालली आहे, असे "शिवप्रतिष्ठान" च्या एका कार्यकर्त्याने "वार्तापत्र"शी बोलतांना सागितले... शिवाजी महाराज होऊन गेले, त्याला ४०० वर्षे झाली... देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळाले, त्यालाही ६० वर्षे झाली... पण स्वतंत्र भारतातही नागरिकांना अजून मुघली मानसिकते विरुद्ध लढा द्यावा लागतो आहे, असेही एका सांगलीकराने सांगितलॆ... आणि स्वतंत्र भारतातले पोलिस देखिल इंग्रजी पोलिसांप्रंमाणेच ८० वर्षांच्या माणसांवर लाठिमार करतात... तेही बाबा आमटेंशी बरोबरी असणा-या एका ऋषितुल्य व्यक्तीवर.......


देशभरात "जोधा अकबर" ला विरोध वाढू लागला असून "हिन्दू जनजागृती समिती"नेही बहिष्काराचे आवाहन केले आहे...

No comments: